दोन महिन्यांपूर्वी बांधलेल्या संरक्षण भिंतीला तडे
दोन महिन्यांपूर्वी बांधलेल्या संरक्षण भिंतीला तडे
घाटकोपरमध्ये दुर्घटनेची भीती
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. घाटकोपर पश्चिमेतील शिव शंभो मंडल, न्यू दयासागर येथे म्हाडाच्या माध्यमातून दोन महिन्यांपूर्वी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. या भिंतीला कोसळणाऱ्या पावसामुळे तडे गेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ही भिंत केव्हाही खाली कोसळून दुर्घटना घडू शकते.
संरक्षण भिंतीखाली शेडगे महाराज यांचे मठ असून, भिंतीच्या अवतीभवती काही घरे आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख सुरेश पाटील यांनी तातडीने अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनेचा आढावा घेतला. या वेळी पालिका अधिकारी विजय कुमार वाघ, वैभव कांबळे यांनी पाहणी करून शेजारील दोन घरातील कुटुंबांना सुरक्षास्थळी हलवले. ही संरक्षण भिंत वेळीच पाडून नव्याने संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी विभागप्रमुख सुरेश पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

