कासा येथे भाजपातर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

कासा येथे भाजपातर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

Published on

कासा येथे भाजपतर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा
अहिल्यादेवींच्या पराक्रमाचे चित्रमय दर्शन
कासा, ता. २७ (बातमीदार) ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने कासा येथे एक विशेष जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कासा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. २७) पार पडलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अहिल्यादेवींच्या पराक्रमाची गाथा शब्दांत रंगवली गेली. त्यांनी मंदिरांची पुनर्बांधणी, नदी घाटांचे सौंदर्यीकरण, धर्मकार्यांची योजना अशा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यातून जे योगदान दिले, त्याचे चित्रमय दर्शन उपस्थितांना घडवण्यात आले. या वेळी ३०० वर्षांपूर्वीचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहत होता. स्पर्धेत विविध वयोगटांतील कलाकारांनी भाग घेत अहिल्यादेवींच्या जीवनप्रवासाला रंगात उतरवले. काही चित्रांत त्यांच्या न्यायनिष्ठा दिसून आली, तर काहींनी त्यांच्या जनकल्याणकारी कार्याचा रंगीत आविष्कार साकारला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, शैलेश घारपुरे, भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष ॲड. आशीष चव्हाण, स्पर्धा प्रमुख महेंद्र पवार यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेपूर्वी, सोमवारी (ता. २६) डहाणू येथील भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या कार्यालयात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत पुंडलिक भानुशाली यांचे मार्गदर्शन लाभले.
संपूर्ण कार्यक्रमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com