प्रियकराच्या मदतीने विवाहतीकडून पतीची हत्या

प्रियकराच्या मदतीने विवाहतीकडून पतीची हत्या

Published on

प्रियकराच्या मदतीने विवाहिताकडून पतीची हत्या
पोलिस तपासात बाब उघड; आरोपी गजाआड
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : रबाळे एमआयडीसीत राहणाऱ्या सुरेश हरिप्रसाद यादव (वय २४) या रिक्षाचालकाने त्याची विवाहित प्रेयसी पूनम वाघमारे (वय २८) हिच्या सांगण्यावरून तिच्या पतीची हत्या केली होती, शिवाय त्याचा मृतदहे ठाण्यातील बाळकुम येथील खाडीमध्ये टाकून दिला होता. पोलिस तपासामध्ये ही बाब उघड झाली असून, त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पुनम वाघमारे व तिचा प्रियकर सुरेश यादव या दोघांना हत्येच्या गुह्यात अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून गेल्या १० दिवसांपासुन मृत कालिदास वाघमारे याचा बाळकूम येथील खाडीत शोध घेण्यात येत आहे, मात्र अद्याप त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागेलेला नाही.
या घटनेतील मृत कालिदास वाघमारे हा पूनम वाघमारे व दोन मुलांसह रबाळे एमआयडीसीत रहाण्यास होता. कालिदास दारू पिऊन आल्यानंतर दरदिवशी पूनमला मारझोड करत होता. लग्न झाल्यापासून त्याच्याकडून पूनमचा छळ सुरू होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पूनमचे त्याच भागात राहणाऱ्या सुरेश यादव याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर या दोघांनी लग्नसुद्धा करायचे ठरवले होते, मात्र कालिदास हा अडसर ठरत असल्याने पूनम वाघमारे हिने त्याला कायमचे संपवून टाकण्यास सुरेश यादव याला सांगितले होते. ठरल्यानुसार पूनम आपल्या गावी गेल्यानंतर सुरेश यादव याने १६ मे रोजी रात्री घराची चावी देण्याच्या बहाण्याने कालिदासकडे गेला, त्यानंतर सुरेश यादव याने आपल्या रिक्षामधून कालिदासला सोबत नेऊन त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याने कालिदासच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली. दरम्यान, हत्या केल्यानंतर कालिदासचा फोटो पूनमच्या व्हॉट्सॲपवर पाठवून दिला होता. त्यानंतर तिच्या सांगण्यानुसार त्याने कालिदासचा मृतदेह रिक्षामधून ठाण्यातील बाळकूम भागातील खाडीमध्ये टाकून दिला होता. त्यानंतर पूनमने आपल्यावर संशय येऊ नये यासाठी १९ मे रोजी गावावरून परत आल्यानंतर रबाळे पोलिस ठाण्यात जाऊन कालिदास हरवल्याची तक्रार दाखल केली. याचवेळी पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com