ठाणे-गुजरात प्रवास कटकटीचा

ठाणे-गुजरात प्रवास कटकटीचा
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे शहरातून गुजरातकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून घोडबंदर रोडकडे पहिले जाते. या मार्गिकेवरील मास्टिकचे फुगवट्यांमुळे चालक हैराण आहेत. अशातच अवकाळी पावसाने माजिवडा उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे प्रवास कटकटीचा झाला आहे.
जेएनपीटी बंदरातून येणारी अवजड वाहने गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी घोडबंदर मार्गाचा वापर करतात, पण पहिल्याच पावसात या मार्गावरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. सध्या या मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचे काम सुरू आहेत, तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने माजिवडा उड्डाणपुलावरील मुंबई मार्गिकेचे काम हाती घेतले, मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे हे काम थांबले आहे, तर वाघबीळ, मानपाडा, पातलीपाडा या पुलांच्या दुरुस्तीचे कामही सुरू होऊ शकलेले नाही. माजिवडा पुलावरील मुंबई मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने दुचाकी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे मानपाडा पुलावरही खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे.
--------------------------------------------
समन्वयाचा अभाव
सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, एमएमआरडीए आदी विविध प्राधिकरणांनी आपापल्या हद्दीतील सर्व रस्त्यांची पाहणी करून आवश्यकता असेल तिथे दुरुस्तीचे नियोजन करावे. दुरुस्ती झाल्यावर स्वतः प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी, असे पालिका प्रशासनाने निर्देश दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com