डॉ. योगेश लखानी यांची ‘कान्स’ला हजेरी

डॉ. योगेश लखानी यांची ‘कान्स’ला हजेरी
Published on

डॉ. योगेश लखानी यांची ‘कान्स’ला हजेरी
मुंबई, ता. २७ : प्रतिष्ठित ७८व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ब्राइट आऊटडोअर मीडिया लिमिटेडचे ​संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश लखानी यांनी हजेरी लावली. ‘क्लासिक टक्सिडो’ परिधान केलेले डॉ. लखानी यांनी या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या परिधानात लखानी यांचा सुसंस्कृतपणा, आत्मविश्वास दिसून येत होता. लखानी यांनी चौकटीपलीकडे जात मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले एक वेगळे स्थान मिळवले आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीवर त्यांच्या उल्लेखनीय प्रभावासाठी ओळखले जाणारे डॉ. लखानी यांना राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) यांनी आमंत्रित केले होते. कान्समधील त्यांची उपस्थिती केवळ वैयक्तिक यशाचे प्रतीक नव्हे तर जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेत भारताच्या वाढत्या पाऊलखुणा अधोरेखित करत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com