काढलेला गाळ नाल्यात

काढलेला गाळ नाल्यात

Published on

काढलेला गाळ नाल्यात
पावसाचा नालेसफाईला फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबईत झालेल्या जोरदार पावसाने नालेसफाईच्या कामांचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. नालेसफाई करताना नाल्यात काढून ठेवलेला गाळ मुसळधार पावसाच्या फटक्याने पुन्हा नाल्यात गेला आहे. त्यामुळे नाले पुन्हा गाळाने भरले आहेत.
मुंबईत पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यात १० टक्के आणि पावसाळा संपल्यावर १० टक्के अशा तीन टप्प्यात छोटे आणि मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्यात येतो. मुंबई महापालिकेने २३ कंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी नदी व इतर नदी पात्रातील गाळ काढण्याची कंत्राटी कामे देण्यात आलेली आहेत.
कंत्राटदारांना नालेसफाई कामानंतर फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वेळी पहिल्यांदाच एआय या तंत्रज्ञानाचा उपयोग नालेसफाईसाठी करण्यात आला. संबंधित अभियंत्यांनाही कामाच्या ठिकाणी हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असूनही मुंबईतील बहुतांश छोटे नाले गाळांनी भरले आहेत. प्रशासनाने मोठ्या नाल्यांवर लक्ष केंद्रित केले. मात्र छोट्या नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष झाले. छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ बाहेर काढून ठेवण्यात आला होता. मुसळधार पावसाने गाळ परत नाल्यात गेला आहे. त्यामुळे नाले पुन्हा भरल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

गाळ काढण्याचे एकूण उद्दिष्ट - ९,६१,७२४.४३ मेट्रिक टन
आतापर्यंत काढलेला गाळ - ६,९६,६३१.१७ मेट्रिक टन
शहर - २२,४०३.७७ मेट्रिक टन
पूर्व उपनगर - १,१२,४१७.८२ मेट्रिक टन
पश्चिम उपनगर - १,९९,७४५.११ मेट्रिक टन
छोटे नाले २,४३,४२०.७५ मेट्रिक टन
मिठी नदी - १,१३,८४३.७२ मेट्रिक टन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com