प्रसिद्ध रॅपरला खंडणीसाठी धमकी

प्रसिद्ध रॅपरला खंडणीसाठी धमकी

Published on

प्रसिद्ध रॅपरला जीवे मारण्याची धमकी
सिद्धू मुसेवालावर गाणे केल्यानंतरचा प्रकार
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : एमीवे बंटाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॅपर बिलाल शेख याला अज्ञात व्यक्तीने एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली. बंटाई म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर पाठवलेल्या मेसेजमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई, लॉन ग्रुप, रोहित गोदरा यांची नावे नमूद केली आहेत. विशेष म्हणजे ‘ट्रिब्युट टू सिद्धू मुसेवाला’ हे गाणे प्रदर्शित केल्यानंतर एमीवे बंटाईला धमकी दिली आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
सीवूड्स येथे राहणारा रॅपर एमीवे बंटाई ऊर्फ मोहम्मद बिलाल शेख याने नुकतेच ‘ट्रिब्युट टू सिद्धू मुसेवाला’ हे गाणे प्रदर्शित केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला अज्ञात व्यक्तीने बंटाई म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने ‘मी गँगस्टर गोल्डी ब्रार असून, तुझ्या सिंगरकडे २४ तास आहेत. एक कोटी रुपये दे नाहीतर जीवे मारले जाईल’, अशी धमकी दिली. तसेच त्यापुढे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई ग्रुप, गँगस्टर लॉन ग्रुप, गँगस्टर रोहित गोदरा असा संदेश लिहिण्यात आला आहे. हा मेसेज लक्षात आल्यानंतर बंटाई म्युझिक कंपनीच्या व्यवस्थापिकेने एमीवे बंटाईला माहिती देऊन एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com