दुसऱ्याच दिवशी अकरावी प्रवेशाची नोंदणी ४ लाख ८८ हजारांवर
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस राज्यभरातून चांगला प्रतिसाद
पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई, ता. २७ ः राज्यभरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश नोंदणीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल चार लाख ८८ हजार २४ विद्यार्थ्यांनी विविध जिल्ह्यांतून प्रवेश अर्जांची नोंदणी केली. यात दोन लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज आणि त्याचे शुल्कही भरले असून, या नोंदणीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
पहिल्या दिवशी दोन लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर दुसऱ्या दिवशी ही संख्या चार लाख ८८ हजार २४ पर्यंत पोहोचली असल्याने राज्यभरात विद्यार्थ्यांचा या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही किरकोळ अडचणी आल्यास त्या शिक्षण उपसंचालक आणि हेल्पलाइनच्या माध्यमातून सोडवल्या जात असून, त्यामुळे विद्यार्थ्यांची ही नोंदणीची संख्या दुसऱ्या दिवशी दुपटीहून अधिक वाढल्याचे डॉ. पालकर म्हणाले. दरम्यान, अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनीही पसंती दर्शवली असून, त्यांच्याकडून दोन हजार ८२३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एक हजार ११४ विद्यार्थ्यांचा भाग १ आणि ५४६ विद्यार्थ्यांना भाग २ लॉक झाला आहे. दुसऱ्या दिवशी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज आणि त्याचे शुल्कही भरले असून, यातील पहिला भाग हा एक लाख ७५ हजार ५८४ आणि दुसरा भाग ८१ हजार ७६६ विद्यार्थ्यांचा लॉक झाला असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.
...
काही ठिकाणी विलंब
ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थी पालकांच्या दुसऱ्या दिवशी काही किरकोळ तक्रारी आल्या तरी त्यांचे लगेच समाधान करण्यात आले. पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये इंटरनेट आदींच्या सुविधाही बाधित झाल्याने काही ठिकाणी ही नोंदणी विलंबाने झाली, तर काही ठिकाणी ती होऊ शकली नसल्याचेही दिवसभरात दिसून आले. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केली नाही, त्यांनी ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन संचालक डॉ. पालकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

