रानभाज्यांचा हंगाम संकटात

रानभाज्यांचा हंगाम संकटात

Published on

ठाणे, ता. २८ (बातमीदार)ः श्रावणातील पारंपरिक जेवणामध्ये टाकळा, कुई, कंटोळी, मायाळू, दिंडा, भुई आवळी, गोदण, तरोटा अशा रानभाज्यांना महत्त्व असते; पण अवकाळी पाऊस तसेच जंगल परिसरातील चिखलामुळे यंदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच रानभाज्या महागल्या आहेत.
कर्जत, नेरळ, मुरबाड, वसई-विरार, शहापूर परिसरातील आदिवासी व ग्रामीण भागातील महिला सकाळच्या पहिल्या लोकलने रानातून भाज्या तोडून थेट ठाणे तसेच आजूबाजूच्या बाजारांत विक्रीसाठी येतात. त्यांच्यामुळे शहरातील नागरिकांना जंगलातील पारंपरिक आणि औषधी रानभाज्यांचा स्वाद घेता येतो; मात्र यंदा हवामानाच्या अनिश्चिततेमुळे तसेच पडलेल्या अवकाळी पावसामुळे रानभाज्यांचा हंगाम मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी, भाज्यांची उपलब्धता आणखी कमी होण्याची शक्यता असून त्यांच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
-----------------------------------
औषधी गुणधर्मामुळे मागणी
रानभाज्यांमधील टाकळा पचनास मदत करणारा असून, कुई उष्णता कमी करणारी आहे. कंटोळी मधुमेह नियंत्रणासाठी, मायाळू स्नायूंना बळकटी देणारी, दिंडा रक्तशुद्धीसाठी तर भुई आवळी कावीळ, मूतखडा आणि उच्च रक्तदाबावर उपयुक्त मानली जाते.
---------------------------------------
भाजीचे प्रकार दर
टाकळ्याची जुडी ३०
कुई ५०
मायाळू ५०
गोंदण ३५
भुई आवळी ५०
एकळा, पिंडा ३०
तरोटा २०
गवती चहा १५
शिंगाडा ७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com