६० हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

६० हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

Published on

वाशी, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न बिकट होत चालला आहे. कुत्र्यांची संख्या वाढू नये यासाठी पालिकेकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते. नवी मुंबई महापालिकेने २००६ ते २०२४ या १८ वर्षांत एक लाख आठ हजार ७३५ कुत्रे पकडले असून, त्यांतील ५९ हजार ८२७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसला आहे.
नवी मुंबई महापालिकेत २०११च्या पशुगणनेनुसार भटक्या कुत्र्यांची संख्या ही ३० हजारांपर्यंत होती. त्यानंतर २०१९ मध्ये भटक्या कुत्र्यांचे महापालिकेने सर्वेक्षण केले होते. दरम्यान, कोरोना आजाराची साथ आल्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या सर्वेक्षणाचा अहवाल मिळाला नव्हता. त्यानंतर २०२४ मध्ये पालिकेने भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले असून, त्याचा अहवाल लवकरच सादर होईल. नवी मुंबईत मागील १८ वर्षांत ५९ हजार ८२७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आली आहे. नवी मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या सद्य:स्थितीत २० ते २२ हजारांच्या सुमारास असण्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येत असल्यामुळे संख्या घटली आहे.
-------------------
रात्री प्रवास करणे धोक्याचे
भटक्या कुत्र्यांमुळे रहिवाशांना रात्रीच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनचालकांना नोडमधून प्रवास करणे कठीण झाले आहे. अनेक कुत्री पादचारी व वाहनचालकांचे लचके तोडत आहेत. त्यामुळे कुत्र्यांची संख्या आटोक्यात यावी, यासाठी पालिकेकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. २०२४-२५मध्ये पालिकेने सात हजार ४४२ कुत्री पकडली असून, त्यातील एक हजार २७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. २०२३-२४ मध्ये सात हजार ४४२ कुत्री पकडून त्यातील एक हजार २७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com