
पालघरमध्ये पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आउट
दारूबंदीसह गुटखाविक्रीवर कारवाई; ६५ पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग
पालघर, ता. २८ (बातमीदार) ः पालघर पोलिस दलाकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन आॅल आउट अभियानांतर्गत दारूबंदीसह गुटखाविक्रीविरोधात तीन गुन्हे तसेच विविध २२२ गुन्ह्यांसह वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या अभियानात ६५ पोलिस अधिकारी आणि २६६ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
पालघर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळेंसह विभागीय पोलिस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी यांच्यासह पोलिस अंमलदारांच्या सक्रिय सहभागातून २७ मे रोजी ऑपरेशन ऑफ आउट राबविण्यात आले. या अभियानादरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पालघर जिल्हा पोलिस दलाने १६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये २५ महत्त्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी केली. तसेच १९ वस्त्यांमध्ये एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या वेळी विविध गुन्ह्यांतील आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच या ऑपरेशन ऑल आउट अभियानामध्ये दारूबंदी कायद्याप्रमाणे ११ गुन्हे दाखल करून ६५ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुटखा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तीन गुन्हे दाखल करून ५५ लाख २३ हजार ५८ रुपयांच्या मुद्देमालावर कारवाई केली तसेच १२२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ४९ व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात आले. तसेच मोटार वाहन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. १२९ वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करून ५४ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सक्त सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.