दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर

दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर

Published on

दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर
डॉ. श्रीकांत शिंदे यांची आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानवर सडकून टीका

काँगो, ता. २८ : ‘भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो; मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो, भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो तर पाकिस्तान दहशतवादाचे मार्ग तयार करतो; भारत चंद्रयान आणि इतर उपग्रह प्रक्षेपित करतो, तर पाकिस्तान आपल्या भूमीवरून इतर देशांमध्ये दहशतवादी पाठवतो,’ अशी परखड टीका करत शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आतंरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला लक्ष्य करत केली. तर गेल्या अनेक दशकांपासून भारताने दहशतवादी हल्ले सहन केले आहे; मात्र आता भारत दहशहतवाद सहन करणार नाही. प्रत्येक दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देखील खासदार शिंदे यांनी पाकिस्तानला दिला.


यूएईच्या यशस्वी दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नुकताच काँगो लोकशाही प्रजासत्ताक देशाचा दौरा केला. यावेळी त्यांनी काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठकादेखील पार पडल्या. या बैठकीदरम्यान काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी या दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध करत, कोणत्याही परिस्थितीत अशा हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही, हे स्पष्ट केले. त्यांनी दहशतवादाच्या जागतिक संकटाविरोधात लढण्याची कटिबद्धता व्यक्त केली आणि भारतासोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. परराष्ट्र राज्यमंत्री थेरेस वाग्नर यांनी भारताने सीमापार दहशतवादासंदर्भातील माहिती दिल्याबद्दल आभार मानले. भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्यात काँगो प्रजासत्ताक पूर्णपणे पाठिशी आहे, आणि जागतिक व्यासपीठांवर, जिथे काँगो सदस्य आहे, तिथे भारताचा संदेश पोहोचवण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. त्यांचे लोकसभेचे अध्यक्ष व्हायटल कामेरे यांनी भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि काँगोच्या जनतेने भारताच्या वेदनेत सहभाग असल्याचे सांगितले. त्यांनी भारताच्या प्रयत्नांना काँगो लोकसभेच्यावतीने पाठिंबा दिला. तर सिनेट अध्यक्ष ज्याँ-मिशेल समा लुकोन्दे यांनी सांगितले की, दहशतवादाविरोधातील लढा आणि शांततेचा ध्यास हे भारत आणि काँगो प्रजासत्ताकचे समान ध्येय आहे. जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात एकसंघ आवाज उठवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

....
पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त
शिष्टमंडळाने काँगोच्या प्रसारमाध्यमांशीही संवाद साधत पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत तसेच भारताच्या सीमापार दहशतवादविरोधी लढ्याविषयी माहिती दिली. भारताच्या ‘दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुते’च्या धोरणावरही त्यांनी भर दिला. शिष्टमंडळाचे प्रमुख डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना काँगोच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चांबाबत माहिती दिली आणि भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला काँगो सरकारने दर्शवलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com