१०४ कफ सिरपच्या बॉटल्स युवकाला अटक
कफ सिरप विकणाऱ्या युवकाला अटक
ठाणे, ता. २९ : नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कफ सिरपच्या बाटल्यांच्या विक्रीसाठी आलेल्या इरफान अन्सारीला (३०) ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १४ हजार ५६० रुपये किमतीच्या १०४ सीलबंद बॉटल्स जप्त केल्या आहेत. राबोडी, साकेत रोड येथील साकेत ग्राउंडजवळ २२ ते २५ वर्षीय युवक कप सिरपच्या बाटल्यांच्या विक्रीकरिता येत असल्याची गोपनीय माहिती ठाणे गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी (ता. २७) कारवाई केली. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात एनडीपीसी कायदा कलम ८(क),२१(ब)सह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०चे कलम १८अ, १८ ख, शिक्षा कलम २७ क व २८ क प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
...........
बीडमधील महिला गांजासह जेरबंद
ठाणे, ता. २९ : बीड येथून गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. तिच्याकडून २२ हजार ६८० रुपये किमतीचा एक किलो १३४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
कॅडबरी जंक्शनजवळील ओव्हर ब्रिजखाली गांजा विक्रीसाठी एक महिला येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून उषा पवार या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याजवळ गांजासह रोख २०० रुपये असा २२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत महिलेला अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.