

विरार, ता. १ (बातमीदार) : वसईच्या पूर्वपट्टीतील नागले शाळा आवारात पेव्हरब्लॉक बसविणे आणि शाळेचा रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी सदस्य कृष्णा माळी यांच्या उपस्थितीत पार पडले. या कामासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या वेळी सरपंच प्रमिला कोदे, उपसरपंच अनिता म्हसेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कोदे, माजी उपसरपंच रूपेश मेढे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सपना जी. तुंबडा, माजी उपसरपंच उमेश पाटील, भरत पाटील, संतोष मुकादम, विनोद हजारे आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शाळेच्या दोन धोकादायक वर्गखोल्या पाडून त्याजागी नवीन बांधकामासाठी ३० लाखांचा निधी पालघर जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करून घेण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.