ठाणे महापालिकेत बेरोजगारांना संधी

ठाणे महापालिकेत बेरोजगारांना संधी
Published on

ठाणे, ता. ३१ : पालिका सेवेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरी सुविधांवर ताण वाढत आहे. अशातच पालिकेने ९१ जणांना पदोन्नती दिली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या अत्यावश्यक सेवेतील अभियांत्रिकीची ६६ आणि अग्निशमन विभागातील ३८२ फायरमनची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ठाणे महापालिकेत बेरोजगारांना नोकरी मिळण्याची संधी वाढली आहे.
ठाणे पालिकेच्या सेवेतून अनेक कर्मचारी निवृत्त होत आहेत. शहराची वाढणारी लोकसंख्या आणि महापालिकेचा कामाचा वाढता व्याप लक्षात घेता, वर्ग एक ते वर्ग चारपर्यंतची १० हजार ९०० पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील ३० जूनपर्यंत सहा हजार १०४ पदे भरण्यात आली असून चार हजार ७९४ पदे आकृतीबंध मंजूर होऊनही अद्याप रिक्त आहेत. अशातच ठाणे महापालिकेच्या सेवेतून दरमहा २५ ते ४५ कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेत कित्येक वर्षांपासून कार्यरत १५८ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे; पण महापालिकेत कार्यकारी पाच, उपअभियंता (नागरी) सात, कनिष्ठ अभियंता (नागरी) ७७ आणि कनिष्ठ अभियंता दोनची ६६ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंत्याची पदे २०१६ पासून रिक्त आहेत. तीदेखील भरली गेली नसल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर आहेत. त्यात आरोग्यसेवेतील महत्त्वाची पदे टप्प्याटप्प्याने भरली जात आहेत. आता अभियांत्रिकीची (कनिष्ठ अभियंता) शिल्लक ६६ पदे भरली जाणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी दिली आहे.
........................
अपुऱ्या मनुष्यबळामुळे ताण
एकीकडे ठाणे शहराचा विस्तारीकरण होत असताना, दुसरीकडे अग्निशमन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. सद्यःस्थितीत विभागात १८५ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटी स्वरूपातील १२३ असे ३०८ जणांचे मनुष्यबळ कार्यरत आहे. फायरमनची ४५० पदे मंजूर असताना ६८ पदे भरली गेली; परंतु ३८२ फायरमनची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात १८० फायरमन कायमस्वरूपी जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com