मिठीच्या भ्रष्टाचाराच्या मुख्य सुत्रधारांची चौकशी करा ः लाड

मिठीच्या भ्रष्टाचाराच्या मुख्य सुत्रधारांची चौकशी करा ः लाड
Published on

मिठीच्या भ्रष्टाचाराच्या मुख्य सूत्रधारांची चौकशी करा ः लाड
मुंबई, ता. ३१ ः मिठी नदीच्या विविध कामांचा घोटाळा गेल्या १५ वर्षांत सुमारे १,३०० कोटींपर्यंत पोचला आहे. या घोटाळ्यात छोट्या कंत्राटदारावर कारवाई झाली; मात्र या नदीतील गाळ वांद्र्यात कुठपर्यंत येतो, हे तपासायला हवे. याची निःपक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे उपाध्यक्ष आणि विधान परिषदेतील पक्षाचे मुख्य प्रतोद प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच या पत्रकार परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधला.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी मिठी नदीच्या भ्रष्टाचारप्रकरणी मातोश्रीला लक्ष केले. ते म्हणाले की मिठी नदीचा केवळ दोन वर्षांतील घोटाळा काढण्याऐवजी गेल्या १५ वर्षांतील कामांचा घोटाळा सुमारे १,३०० कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. मिठी नदीच्या विविध कामांत तीन ते सात कोटींपर्यंत निविदा प्रक्रिया राबविल्या. त्यात छोट्या ठेकेदारांना लक्ष केंद्रित करण्यात आले. मुख्य तक्रारी आणि चौकशीपासून लक्ष विचलित करण्यात येत आहे. मात्र मुख्य सूत्रधार मोकाट आहेत, असे आरोप त्‍यांनी पत्रकार परिषदेत केले.

गाळ टाकला कुठे?
आमदार लाड म्हणाले, की चौकशी मागील १५ वर्षांची करावी, अशी आमची मागणी आहे. शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असताना झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणे, हे आमचे काम आहे. १,२००-१,३०० कोटींचा मिठी नदीच्या कामांचा हा घोटाळा आहे. मिठीच्या कामावर वर्षाला २५०-३०० कोटी खर्च करतो आणि दीड लाख टन कचरा बाहेर काढतो, असे म्हणता मग हा कचरा कुठे टाकला, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जी ठिकाणे कंत्राटदारांकडून सांगितली जातात तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com