

घनकचरा व्यवस्थापन शुल्क योजना कायमची रद्द करा
खासदार गायकवाड यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः मुंबईकरांवर दडपशाहीने घनकचरा व्यवस्थापन शुल्क लादण्याचा प्रस्ताव दिला आणि आता घनकचरा शुल्क स्थगित केल्याचे सांगत आहेत. याला मुंबईकरांचा व काँग्रेसचा विरोध असून हा घनकचरा व्यवस्थापन शुल्क योजना कायमची रद्द करा, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई महापालिका अधिनियम, १८८८च्या कलम ६१(A) आणि ६१(C) नुसार, घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. सरकार एवढ्यावरच थांबले नसून मुंबईतील रेडीरेकनर दरांमध्ये सरासरी चार टक्के वाढ केली आहे, ज्यामुळे घर घेणे आणखी महाग होणार आहे. मालमत्ता करातही वाढ आहे. पाणीदरात आठ टक्के वाढ प्रस्तावित आहे. ही १३ ते २० टक्क्यांची भरमसाट मालमत्ता कर वाढ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करीत वाढ केली जात आहे. मुंबईकरांवरील ही थेट लूट लादल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन कर फक्त स्थगित केला असल्याचे खासदार गायकवाड यांनी म्हटले आहे. हे सरकार मुंबईकरांची लूट करीत आहे. सरकारने ही लूट थांबवावी, घनकचरा व्यवस्थापन शुल्क योजना कायमची रद्द करा, अन्यायकारक मालमत्ता करवाढ तत्काळ मागे घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.