दहशत माजवणाऱ्याला नाशिकमधून बेड्या

दहशत माजवणाऱ्याला नाशिकमधून बेड्या
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : दहशत माजवून खंडणी उकळणाऱ्या तसेच जबरी चोरी करणाऱ्या सराईत सनी तेलुरेला (२३) ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी (ता. २८) नाशिकमधून अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोपरीत राहणाऱ्या सनीवर १६ गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी (ता. २३) तक्रारदार वाहनाचे सर्व्हिसिंग सेंटर चालवणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला सराईत गुन्हेगार सनी तेलुरेने अडवून कोयत्याचा धाक दाखवत महिना तीन हजारांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली होती. तक्रारदाराने हप्ता देण्यास नकार दिल्याने दोन हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच कोयत्याच्या धाकावर उभ्या गाड्यांची तोडफोड करून व्यापाऱ्यांना लोकांना धमकावून दहशत निर्माण केली. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात सनी तेलुरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
------------------------------------
२ जूनपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांचा ससेमिरा मागे लागताच पळालेल्या सनीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक स्थापन केले होते. त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बुधवारी (ता. २८) नाशिक येथून खंडणीविरोधी पथकाने अटक केली. न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com