

ठाणे शहर, ता. ३१ (बातमीदार)ः पाच वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ओडिशातील २४ वर्षीय तरुणाच्या गुडघ्यावर दुर्बिणीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. लाखोंचा खर्च येणारी ही शस्त्रक्रिया ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत करण्यात आली आहे.
ओडिशातील मूळचा रहिवासी असलेला युवक ठाण्यात मजुरीचे काम करीत होता. कामावेळी त्याच्या पायात वेदना होत होत्या. त्याने जिल्हा सामान्य रुग्णलयात तपासणी केली असता एक्स-रे व एमआरआय चाचणीतून गुडघ्याची एक लिगामेंट पूर्णपणे तुटलेली आणि गादी (मेनिस्कस) फाटली होती. अतिशय गंभीर आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल असलेल्या या शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. धीरज महांगडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे गुरुवारी (ता. २९) शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी त्याच्या गुडघ्यात नवीन लिगामेंट बसवण्यात आली असून, फाटलेली गादीदेखील पूर्ववत करण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. धीरज महांगडे, डॉ. मोहन मुराडे, डॉ. दीपेश पाटील, डॉ. प्रियंका महांगडे, डॉ. रूपाली यादव यांनी काम केले.
-----------------------------------------
खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येतो; मात्र जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. या रुग्णावरदेखील अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.