

मोठागाव रेतीबंदर येथे वाळू तस्करांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ ः डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागात उल्हास नदीकाठी महसूल विभागाने बुधवारी (ता. २८) अचानक छापा टाकला. या कारवाईत वाळू तस्करांनी खाडीकिनारी साठा करून ठेवलेली १२ लाख रुपयांची वाळू हस्तगत केली. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात ढकलून दिली. तसेच वाळू तस्करांच्या किनारी उभ्या करून ठेवलेल्या सामानाची, हौदांची तोडमोड करीत ते उद्ध्वस्त करण्यात आले.
कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना डोंबिवली पश्चिमेत मोठागाव ठाकुर्ली रेतीबंदर भागात उल्हास खाडीकिनारी वाळू तस्करांनी वाळूचा साठा करून ठेवल्याची आणि ही वाळू ते विक्रीसाठी लवकरच उचलणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तहसीलदार शेजाळ यांनी याविषयी डोंबिवलीतील ठाकुर्ली विभागाचे मंडळ अधिकारी रवींद्र जमदारे आणि कल्याणचे मंडळ अधिकारी दीपक गायकवाड यांना माहिती दिली. दोन्ही मंडळ अधिकाऱ्यांनी मोठागाव खाडीकिनारी येऊन वाळूसाठ्याची खात्री केली. तेथे वाळूसाठ्यासाठी बांधलेल्या हौदांची पाहणी केली. याठिकाणी वाळू तस्करांनी वाळूउपसा करून साठा केल्याची खात्री पटल्यावर बुधवारी सकाळी मंडळ अधिकारी जमदरे, गायकवाड यांनी ग्राम महसूल अधिकारी अरुण कासार, वैभव झापडे, भारती शेटे, हनुमंत जाधव, अश्विनी थोरात यांच्या साहाय्याने खाडीकिनारी भागात धडक मारली. सोबत जेसीबी, तोडकाम पथक आणि पोलिस बंदोबस्त होता.
खाडीकिनारी भागात साठवण हौदात २२ ब्रास रेती तस्करांनी साठा करून ठेवली होती, असे महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. महसूल विभागाच्या पथकाने हौदांमध्ये साठवण करून ठेवलेली वाळू जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा खाडीत ढकलून देण्याचे काम केले. अशाप्रकारे सुमारे १२ लाख रुपये किमतीची वाळू महसूल विभागाच्या पथकाने उल्हास खाडीत ढकलून दिली. त्यानंतर खाडीकिनारी वाळू तस्करांनी वाळू साठा करून ठेवण्यासाठी तयार केलेले सिमेंट काँक्रीटचे हौद जेसीबीच्या साहाय्याने नष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.