वीजरोधक मनोऱ्यांसाठी निधी मंजूर

वीजरोधक मनोऱ्यांसाठी निधी मंजूर
Published on

किन्हवली, ता. ३१ (बातमीदार)ः शहापूर तालुक्यात परतीच्या पावसात वीज कोसळून जीवित, वित्तहानीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीजरोधक मनोरे बसवावेत, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. अखेर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीने टाकीपठार परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये वीजरोधक मनोरे बसविण्यासाठी ८९ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
शहापूर तालुक्यातील नवरी जिल्हा परिषद गटातील टाकीपठार परिसरातील झापवाडी, गांगडवाडी, बेलकडी, खरपत नामपाडा, उंबरवाडी, रिकामवाडी, फणसवाडी, हिरव्याची वाडी आंबेखोर, कवट्याची वाडी, कुंभाईची वाडी परिसरात दरवर्षी वीज कोसळून जीवित, वित्तहानी होत असते. या आदिवासी पाड्यांमध्ये वीजरोधक मनोरे बसवावेत, अशी मागणी वर्षानुवर्षे होत होती. ‘सकाळ’ने देखील या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. भाजपचे शहापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक इरनक यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेतून मनोरे बसवण्यासाठी ८९ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com