

अवकाळी पावसामुळे भाज्या महागल्या
डोंबिवली ता. ३१ (बातमीदार) : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाल्याचे उत्पादन खराब झाले आहे, त्यामुळे बाजारात पुरवठा कमी झाला आहे. सध्या बाजारात आलेला भाजीपाला ओलसर आणि नाशवंत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले आहेत. याचा फटका ग्राहकांना बसला आहे.
अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. किरकोळ बाजारात शेवगा १७० रुपये प्रतिकिलो आहे. तर गवार, सिमला मिरची, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचे दर १२० ते १३० रुपये आहेत. पावसामुळे पालेभाज्या पाण्याखाली गेल्या आहेत. घाऊक बाजारात भिजलेल्या अवस्थेत या भाज्या आल्या आहेत. शेतातून बाजारात येईपर्यंत गाडीतील उष्णतेमुळे त्या लवकर खराब होऊ लागल्याने कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे घाऊक बाजारातच कोथिंबिरीची जुडी पाच रुपयांवरून ३० रुपयांवर पोहोचली होती. तर मेथी, पालकाची जुडी १० रुपयांवरून घाऊक बाजारातच ४० रुपये झाली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात पालेभाज्या नावापुरत्याच पाहायला मिळत आहेत.
किरकोळ बाजारातील भाव (प्रति किलो)
टोमॅटो ४०-५० रुपये
कोथिंबीर ४०-५० रुपये
मेथी ५० रुपये
पालक ४० रुपये
सिमला मिरची ९०-१०० रुपये
फ्लॉवर ११०-१३० रुपये
गवार १२० रुपये
शेवगा १६०-१७० रुपये
वांगी ७०-७५ रुपये
गाजर ५०-६० रुपये
काकडी ६०-७० रुपये
भेंडी ९०-१०० रुपये
कारली ७०-८० रुपये
पावसामुळे माल भिजल्याने मोठे नुकसान झाले. भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर झाला. अजूनही बाजारात भाज्यांची आवक ही कमीच आहे.
- लकी मेहता, भाजीविक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.