

वाणगाव, ता. ३१ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील नरपड येथे चिकूच्या बागेमध्ये नैसर्गिकरीत्या मोठ्या मशरूमची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. हे मशरूम पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. १४ इंच उंचीच्या या मशरूमबाबत अनेकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
शेतकरी धनंजय पाटील हे आपल्या चिकूच्या बागेमध्ये फेरफटका मारत असताना त्यांना दुर्मिळ असे भलेमोठे मशरूम दिसले. १४ इंच उंच आणि १४ इंच रुंद अशी या मशरूमची नैसर्गिकरीत्या वाढ झाल्याचे आढळून आले. ही बाब निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील गृहविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. रूपाली देशमुख यांना तत्काळ कळविले. खात्री केल्याशिवाय मशरूमचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या दुर्घटना घडल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. नैसर्गिकरीत्या वाढणारे मशरूम हे काही विषारी, तर काही बिनविषारी असतात, त्यामुळे खात्री केल्याशिवाय सेवन करू नये, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
ओलावा वाढल्याने पोषक वातावरण
नुकताच पावसाने पालघर जिल्ह्याला झोडपल्यामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण असल्याने बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत नैसर्गिकरीत्या मशरूमची वाढ होते, अशी माहिती रूपाली देशमुख यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.