पावसामुळे कांद्याचा भाव वधारला

पावसामुळे कांद्याचा भाव वधारला
Published on

पावसामुळे कांद्याचा भाव वधारला
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : काढणीला आलेल्‍या कांद्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्‍याने बाजारपेठेत आवक घटली आहे. त्‍यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत.
दरवर्षीपेक्षा यंदा कांद्याचे पीक समाधानकारक झाल्याने उन्हाळ्यात कांद्याचे भाव उतरले होते. त्यामुळे वाशीतील एपीएमसी बाजारात व्यापारीवर्गाकडून मोठ्या प्रमाणात कांदा पावसाळ्यासाठी चाळणीत साठवण्यात आला होता. मात्र अवकाळी पावसामुळे एपीएमसी बाजारातील कांदा मोठ्या प्रमाणात भिजल्याने खराब झाला आहे. व्यापाऱ्यांनी साठवलेला कांदाही ओलाव्यामुळे खराब होत आहे. परिणामी यंदा कांदा पुन्हा सर्वसामान्यांना रडवण्याची शक्‍यता आहे.
पावसामुळे कांद्याचे दर वाढणार असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात येत आहे. लागवड केलेला कांदा काढणीला आला होता, मात्र शेतात पाणी साचल्‍याने तो कुजला आहे. नवीन कांदा लागवड केल्‍यास तो बाजारात येण्यास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्‍यामुळे पावसाळ्यात कांद्याचे भाव चढेच राहण्याची शक्‍यता आहे.
मार्चपासून कांद्याचे भाव प्रतिकिलो २५ ते ४५ रुपयांपर्यंत आले होते. एपीएमसीमध्ये चांगल्या प्रतीचा साठवणुकीतला कांदा सध्या प्रतिकिलो १६ ते २० रुपयांनी विकला जात आहे. तर हलक्या प्रतीचा कांदा आठ ते १२ प्रतिकिलो विकला जात आहे. तापमान वाढल्‍याने मे महिन्याच्या सुरुवातीला कांद्याची आवक वाढली होती. मात्र आठवडाभरापूर्वी पडलेल्‍या पावसाने कांद्याला मोठा फटका बसला आहे.

चांगल्या प्रतीच्या कांद्याचे भाव वाढले आहेत. सध्या आवक बऱ्यापैकी आहे, पण १५ जूननंतर आवक किती असेल, त्‍यानुसार भावाचा अंदाज घेता येईल.
- दिगंबर राऊत, व्यापारी, एपीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com