

अंबरनाथ, ता. ३१ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिकेतील सात स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी चार स्वच्छता निरीक्षक इतर नगर परिषदांतून अंबरनाथमध्ये रुजू होणार आहेत. त्यातील तीन पदे रिक्त राहणार आहेत. हे रुजू होणाऱ्या निरीक्षकांच्या आकडेवारीवरून दिसून येते. शहरात स्वच्छतेच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतात, त्यात पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. सध्या तरी नव्याने आलेल्या चार निरीक्षकांवर मोठी जबाबदारी पडणार हे निश्चित. त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेत संमिश्र वातावरण निर्माण झाले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेतील राज्यस्तरीय संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या शासकीय धोरणानुसार झाल्या आहेत. इतर नगर परिषदांतून अधिकाऱ्यांच्या बदल्या अंबरनाथ नगर परिषदेत झाल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. नगर परिषद प्रशासन संचालकांच्या आदेशानुसार राज्यातील बहुतेक सर्व नगरपरिषदेतील संवर्गातील अधिकाऱ्यांच्या ३० मे रोजी बदल्यांचे आदेश काढले आहेत. या शासकीय धोरणानुसार अंबरनाथ नगर परिषदेमध्येही विविध खात्यांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. काही अधिकाऱ्यांच्या अंबरनाथजवळच बदलापूर नगरपरिषदेत तर काहींच्या बदल्या सातारा, रत्नागिरी , पालघर, ओझर आदी ठिकाणी बदल्या झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.