ठाण्यात अहिल्यादेवींवर नर्मदेचा जलाभिषेक

ठाण्यात अहिल्यादेवींवर नर्मदेचा जलाभिषेक
Published on

ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००वी जयंतीनिमित्त धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने मासुंदा तलाव परिसरातील अहिल्यादेवींच्या मूर्तीवर नर्मदेचा जलाभिषेक करण्यात आला. आहिल्यादेवींचे वंशज इंदौरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवींच्या मूर्तीवर शनिवारी (ता. ३१) सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवितके, काजल कवितके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक केला. या वेळी महावितरणचे संचालक मुरहरी केळे, डॉ. अशोक माने, समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे, शिवसेना उपविभागप्रमुख राजेंद्र देसाई, वकील नाना मोटे, पंढरीनाथ चोरमले, उद्योजक सुरेश शिंगाडे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur univercity
Baramati Event: Maharashtra Minister Announces Key Conditions for Farmers' Loan Waiver
sakal
solapur univercity
Marathi News Esakal
www.esakal.com