भारतीयांचा आर्थिक सजगतेत सकारात्मक बदल

भारतीयांचा आर्थिक सजगतेत सकारात्मक बदल

Published on

भारतीयांचा आर्थिक सजगतेत सकारात्मक बदल
मुंबई, ता. ३१ : ‘पश्चिम भारतातील आर्थिक पटामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागले आहेत. त्यातून जीवनविम्याचा अंगीकार टप्प्याटप्प्याने वाढू लागल्याचे दिसू लागले आहे. या प्रदेशातील सुमारे ७२ टक्के लोकसंख्या जीवनविमा पॉलिसींमध्ये गुंतवणूक करत असल्याचे आकडेवारीतून दिसते. त्यामुळे आर्थिक सजगतेत सकारात्मक बदल घडून येत आहेत.’
या प्रवाहाचे खऱ्या अर्थाने परिणाम जाऊन घेण्यासाठी आपण वरवर दिसणाऱ्या आकडेवारीपलीकडे जाऊन पश्चिम भारतातील जीवनविम्याला आर्थिक आवश्यकता मानण्याबाबतच्या या वाढत्या जागरूकतेबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.

जीवनविमा फक्त सुरक्षा साखळी नाही
पश्चिम भारतातील जीवनविम्याचा अंगीकार आयुष्यातील अनिश्चिततांद्वारे अधोरेखित झाला असून त्यामुळे त्याची व्याप्ती वाढत आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होऊ लागले आहे आणि लोकांमध्ये आर्थिक सजगता निर्माण झाली आहे. या बदलत्या प्रदेशात आर्थिक नियोजनाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले असून व्यक्ती आणि कुटंबे जीवविम्याबाबत अधिक चांगल्या प्रकारे विचार करत आहेत आणि दीर्घकालीन सुरक्षा व संपत्ती निर्मितीसाठी त्याला धोरणात्मक साधन म्हणून पाहत आहेत.

अधिक विश्वासः जीवनविम्याबाबत ग्राहकांमध्ये बदल
आर्थिकदृष्ट्या जागरूक पश्चिम भारतातील बदलती परिस्थिती ओळखून विमा कंपन्यांनी सर्वांसाठी एकच मॉडेल निवडण्याऐवजी वेगळा मार्ग काढला आहे. विविध ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजा आणि प्राधान्यांनुसार सुसंगतपणे तयार केलेल्या केलेल्या कस्टमाइज्ड पॉलिसी ग्राहकांशी उत्तम संबंध निर्माण करण्यात आणि विश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जीवनविम्याबाबत चांगले ज्ञान असलेल्या या प्रदेशात ही एक महत्त्वाची बाब ठरते.

इन्शुअरटेकचा प्रभाव: विम्याच्या व्याप्तीचे लोकशाहीकरण
डिजिटल क्रांतीने भारतातील विमा क्षेत्रात मूलभूत बदल केले आहेत. विविध क्षेत्रांमधील डिजिटल व्यवहारांच्या सोयीशी जुळवून घेतलेले भारतीय ग्राहक आता अखंड आणि कार्यक्षम विमा अनुभवांची मागणी करतात. ऑनलाइन प्रीमियम पेमेंट, डिजिटल पॉलिसी व्यवस्थापन आणि सुव्यवस्थित दावे प्रक्रिया यासारख्या वैशिष्ट्यांची आवश्यकता आहे. इन्शुरटेकच्या नवीन कल्पनेमुळे प्रस्थापित बँकअश्युरन्स भागीदारीपलीकडे जाऊन डायरेक्ट-टू-कंझ्युमर (डी२सी) विमा मॉडेल्सचा उदय ग्राहकांना अधिक नियंत्रण आणि विमा कंपन्यांपर्यंत थेट प्रवेश देऊन सक्षम करत आहे. दुसरीकडे एजन्सी चॅनेल धोरणात्मकरित्या अनुकूलन करत आहे. त्यांची पोहोच वाढविण्यासाठी वैयक्तिकृत सल्ला देण्यासाठी आणि या विकसित होत असलेल्या डिजिटल इकोसिस्टममध्ये कार्यरत होण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होऊ लागला आहे.

व्याप्ती आणि प्रभावातील बाबी
डिजिटल व्याप्तीमुळे पोहोच वाढली असली तरी डिजिटल तफावतीची बाब समजून घेणे अत्यावश्यक आहे. विमा कंपन्यांनी समावेशकता निश्चित करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, डिजिटल साक्षरता देऊन प्रवेशाच्या विविध स्तरांतील ग्राहकांना सेवा पुरवली पाहिजे. केवळ धोरण तयार न करता व्यापक आर्थिक शिक्षण आणि दीर्घकालीन ग्राहक सहभाग यांचा समावेश केला पाहिजे.
शाश्वत आर्थिक सुरक्षेची उभारणी
विम्याची ७२ टक्के व्याप्ती प्रभावी असली तरी त्याकडे स्थिर कामगिरी म्हणून पाहू नये. आर्थिक प्राधान्याची शाश्वत संस्कृती जोपासणे हे खरे आव्हान आहे कारण इथे जीवन विमा आर्थिक नियोजनात समाविष्ट केला जातो. यासाठी विमा कंपन्यांनी विशेषतः तरुण लोकसंख्या आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी आर्थिक साक्षरतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांना केवळ पॉलिसी विक्रीपासून ग्राहकांच्या भरोशावर आधारित कायमस्वरूपी संबंध निर्माण करण्याकडे वळवून दीर्घकालीन मूल्यावर भर देणे देखील आवश्यक आहे.

भारतीय ग्राहकांच्या गतिमान गरजा पूर्ण करण्यासाठी जीवन विमा कंपन्यांना उत्पादने आणि सेवा वितरणात सतत नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता आहे आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी दाव्यांचा अनुभव सुरळीत, पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

पश्चिम भारतात जीवन विम्याबाबत हळूहळू वाढणारी आवड एक आशादायक ट्रेंड दर्शवते. या वेगाचा खऱ्या अर्थाने फायदा घेण्यासाठी जीवन विमा कंपन्यांनी शिक्षण, सुलभता आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करून एक सूक्ष्म आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. अशा रितीने ते या गतिमान प्रदेशाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

- राहुल तलवार, मुख्य मार्केटिंग अधिकारी, ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com