

बोरिवलीत कार पार्किंग लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू
मुंबई, ता. ३१ : बोरिवली पश्चिमेतील लिंक रोडवरील एका २१ मजली इमारतीमधील कार पार्किंगसाठी वापरली जाणारी लिफ्ट शनिवारी (ता. ३१) सकाळी अचानक कोसळली. यामध्ये शुभम धुरी (वय ३०) यांचा मृत्यू झाला तर सनजीत यादव (४५) हा गंभीर जखमी झाला.
बोरिवली पश्चिम लिंक रोडवरील ओम प्रथमेश या २१ मजली उंच इमारतीतील कार पार्किंग लिफ्टसाठी शनिवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेत या लिफ्टच्या सात मीटर खड्ड्यात दोघेजण दबले गेले. अग्निशमन दलाने घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले; मात्र यामध्ये गंभीर जखमी झालेले शुभम धुरी यांचा उपचाराआधीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर सनजीत यादव याच्या डोक्याला मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही कार पार्किंग लिफ्ट कशामुळे कोसळली, याची अधिक चौकशी स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आदी यंत्रणेकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.