

राज्याच्या प्रधान सचिवांकडून विकासकामांचा आढावा
पनवेल, ता. ३१ (बातमीदार) ः नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी नुकतीच महापालिकेला सदिच्छा भेट दिली. या वेळी पनवेल महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
या वेळी बैठकीत महापालिकेच्या विविध विकासकामांचे संगणकीय सादरीकरणद्वारे आयुक्तांनी प्रधान सचिवांना सविस्तर माहिती दिली. महापालिकेच्या विविध विकासकामांबद्दल प्रामुख्याने शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, पाणीपुरवठा, आपत्तीकालीन परिस्थिती यासंदर्भात प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांनी सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शन केले. महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेसह बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आयुक्तांनी या वेळी दिली. तसेच महापालिकेने सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण अशा ‘पनवेल कनेक्ट ॲप’ची माहिती देण्यात आली. या कामांबद्दल प्रधान सचिवांनी समाधान व्यक्त केले. वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती देताना आयुक्तांनी येत्या काही दिवसांत महापालिकेतर्फे खारघर व खांदा कॉलनीमध्ये उभारण्यात येणाऱ्या डायलिसिस सेंटरविषयीची तसेच अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांना देण्यात आली. महापालिकेच्या एआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या श्वान सर्वेक्षणाविषयी आणि त्याबाबतचे संगणकीय सादरीकरण प्रधान सचिव महोदयांनी पाहिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, स्वरूप खारगे, मुख्य लेखा वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखापरीक्षक नीलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, श्रीराम पवार, डॉ. रूपाली माने, उपअभियंता विलास चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, डॉ. मधुलिका लाड, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.