

विरारमध्ये छताचे प्लास्टर पडून महिलेचा मृत्यू
नालासोपारा, ता. ३१ (बातमीदार) : विरार पश्चिम एम. बी. इस्टेटमधील धोकादायक इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
परिसरातील मर्चंट अपार्टमेंटमधील सी विंमधील छताचे प्लास्टर गुरुवारी (ता. २९) मध्यरात्री झोपेत अंगावर पडल्याने जखमी झालेल्या अलफिस अब्बास मनासवाला (वय ५४) या महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. ३०) मृत्यू झाला. अलफिस ही हॉलमध्ये झोपली असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळून अंगावर पडल्याने ती जखमी झाली होती. कुटुंबीयांनी तिला तत्काळ संजीवनी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मागच्या आठवडाभरात अशाच घटनेत २१ मे रोजी नालासोपाऱ्यात आई आणि मुलाला रेस्क्यू करून बाहेर काढले. २६ मेला विरार पश्चिम गोपचर पट्ट्यात २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि ३० मे रोजी ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. स्लॅबचे प्लास्टर कोसळून विरार-नालासोपाऱ्यात एका आठवड्यात एकामागून एक सलग तीन घटना घडल्याने धोकादायक, जर्जर इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.