समान मानवी अधिकारांसाठी लढा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : एलजीबीटीक्यू समूहाच्या अस्तित्व आणि हक्काची समाजात जागृतेसाठी तसेच समलैंगिक व्यक्तींना लग्नाचा अधिकार मिळावा, अशा मुद्द्यांवरून ठाण्यात ठाणे प्राइड फेस्टिव्हल उपक्रमांतर्गत शनिवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत समान मानवी अधिकारांची मागणी करण्यात आली.
समलैंगिक व्यक्तींना लग्नाचा अधिकारी मिळावा, या मागणीसाठी ‘द रेनबो पॅरेंट्स’ आणि ‘सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय’ यांच्या सहकार्याने एलजीबीटीक्यू समूहातील तरुण व्यक्तींनी एकत्रित येत रॅली काढली होती. नितीन कंपनी जंक्शनपासून ते मासुंदा तलावापर्यंत निघालेल्या रॅलीतून या समूहाचे अस्तित्व आणि हक्कांबाबत समाजात जागृकता निर्माण व्हावी तसेच समलैंगिक व्यक्तींना लग्न करण्याचा अधिकार तसेच दत्तक अधिकार असे समान मानवी अधिकार प्राप्त व्हावेत, अशा मुद्द्यांबाबत जनजागृती करण्यात आली. या वेळी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ते फक्त मनातून उमलतं’ ‘लग्न मुलाशी असो किंवा मुलीशी काय फरक पडतो’ तसेच ‘एलजीबीटीक्यू समूह त्यांचे हक्क मागत आहे’ अशा विविध आशयाची फलकबाजी करण्यात आली.
---------------------------------
भाजपच्या युवा मोर्चाकडून विरोध
एलजीबीटीक्यू समूहाच्या रॅलीला भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी विरोध केला, परंतु एकीकडे ठाणे शहरात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होत असताताना, दुसरीकडे रॅलीत हक्क मांडताना काहींनी अश्लील पद्धतीचे कपडे परिधान करताना असभ्य वर्तन केले. त्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मासुंदा तलाव येथील रॅली थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही रॅली थांबवण्यास सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.