वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्‍णांची गैरसोय

वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्‍णांची गैरसोय
Published on

श्रीवर्धन, ता. १ (वार्ताहर) ः श्रीवर्धन येथील जीवना कोळीवाडा येथे भाडेत्त्वावरील खोलीत २०२३ मध्ये ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला होता, तर एका वर्षाच्या करारावर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु कंत्राट संपल्‍याने ज्‍या जागेवर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. त्‍यामुळे रुग्‍णांची गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपजिल्‍हा रुग्‍णालयांत नेहमीच गर्दी असते. ताप, सर्दी आजारांसाठी रुग्णांना उपचार व वैद्यकीय चाचण्यासाठी रुग्णालये गाठावी लागत. यात वेळ जात असल्‍याने काही वेळा उपचारास विलंब होतो. त्‍यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला असून, रुग्‍णांना विनामूल्य आरोग्यसेवा व उपचार केले जातात.
जीवना कोळीवाड्यातील एका खोलीत सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत आपला दवाखाना सुरू करण्यात आला होता. कंत्राटी पद्धतीने एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका व एक मदतनीस अशा जागा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत भरण्यात आल्या होत्‍या, मात्र वर्षभराचे कंत्राट संपल्‍यावर संबंधित वैद्यकीय अधिकारी दुसऱ्या ठिकाणी सेवेत रुजू झाला, मात्र श्रीवर्धन येथील आपला दवाखान्यात रिक्त जागेवर अद्यापही वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. सध्या आपला दवाखाना हा एक परिचारिका व एक मदतनीस सांभाळत आहेत. डॉक्‍टर नसल्‍याने ग्रामीण भागातील रुग्‍णांची गैरसोय होत असून, त्‍यांना प्राथमिक उपचारासाठी धावाधाव करावी लागते. त्‍यामुळे लवकरात लवकर आपला दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करावा, अशी मागणी जीवना कोळीवाड्यातील नागरिकांकडून होत आहे.

जीवना कोळीवाडा येथील आपला दवाखानामध्ये लवकर डॉक्टरची नियुक्ती होईल. अलिबाग येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात याबाबतीत प्रस्ताव पाठवला आहे.
- डॉ. संतोष नारायणकर, तालुका आरोग्य अधिकारी, श्रीवर्धन

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

PMC deployed medical teams, ambulances and health booths to ensure uninterrupted healthcare services for Warkaris throughout the pilgrimage.
UP
IMA warned that small hospitals and nursing homes could face closure if the proposed law is implemented without amendments.
A demand has been made to urgently fill more than 27 vacant posts in the health department across Mangalwedha taluka.
Marathi News Esakal
www.esakal.com