

वज्रेश्वरी, ता. १ (बातमीदार): ठाणे जिल्ह्यातील सुपरिचित अशा वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळी काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने येथील ग्रामस्थ हैराण झाले आहे. त्यामुळे येथील पाणीपुरवठा व हॉटेल व्यावसायिकावर परिणाम झाला आहे.
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी तीर्थक्षेत्राला वसई महावितरण विभागातून वीजपुरवठा केला जातो. अशातच पारोळ येथील उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे सतत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे वज्रेश्वरीसह परिसरातील गावांमधील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अचानक पुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. परिणामी, तिन्ही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे ,तर हॉटेल व्यावसायिक, बँका तसेच रुग्णालयाच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे.
-------------------------------------
आंदोलनाचा इशारा
विजेवर चालणारी उपकरणे पंखे, टीव्ही, लाइट उपकरणे खराब होत आहेत. पर्यटनस्थळाच्या नावलौकिकामुळे शनिवार, रविवारी शेकडो भाविक येत असतात, मात्र सातत्याने भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकाराविरोधात महावितरण कार्यालयावर आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधी कक्षाचे जिल्हा संघटक ॲड. सुनील देवरे यांना दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.