उपजिल्हा रुग्णालयाची झाडाझडती

उपजिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
Published on

किन्हवली, ता. १ (बातमीदार)ः शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला.
शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथील प्रेम सदगीर (१४) क्रिकेट खेळत होता. खेळताना चेंडू आणण्यासाठी गेलेल्या प्रेमला विषारी सापाने दंश केला. त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला. या वेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, उपशहराध्यक्ष मनोज पानसरे, नगरसेवक योगेश महाजन, प्रमोद बसवंत उपस्थित होते.
---------------------------------------------------
अतिदक्षता कक्ष सुरू करा
उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता कक्ष सुरू करण्याची मागणी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत तांत्रिक मंजुरीसह कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com