हरवलेले मोबाईल नागरिकांचा परत

हरवलेले मोबाईल नागरिकांचा परत
Published on

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या ११ लाख ९१ हजार ८०० रुपये किमतीच्या ५८ मोबाईल फोनचा शोध घेण्यात गुन्हे शाखा कक्ष-१च्या पथकाला यश आले आहे. हे मोबाईल संबंधित नागरिकांना शनिवारी सहाय्यक पोलिस आयुक्त अजय लांडगे यांच्या हस्ते परत करण्यात आले.
गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता केंद्र सरकारने सीईआयआर (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलचा वापर करून नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ
अधिकाऱ्यांकडून सर्व पोलिस ठाणी व गुन्हे शाखेला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन बाराते, शिपाई विशाल सावरकर तसेच संतोष तांदळे या तपास पथकातील अंमलदारांकडून १२ ते ३१ मेदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. तपासात पोलिस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीतून चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा सीईआयआर पोर्टलवरून आढावा घेत शोध घेतला.

फोनमालकांना समाधान
सीईआयआर पोर्टलचा वापर करून पोलिसांनी शोध घेतला असता, अनेक मोबाईल फोन इतर राज्यांत व महाराष्ट्रातील इतर जिल्‍ह्यांमध्ये वापरात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेत एकूण ५८ नागरिकांचे चोरीला गेलेले व गहाळ झालेले सुमारे ११ लाख ९१ हजार ८०० रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले. त्यानंतर संबंधित फोनमालकांना शनिवारी पावणे येथील कार्यालयात बोलावून ते परत करण्यात आले. त्‍यामुळे फोनमालकांनी समाधान व्यक्‍त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com