

लाखोंच्या घरफोडी प्रकरणातील दुकली गजाआड
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : नेरूळ सेक्टर-३ येथील गंगोत्री सोसायटीमध्ये गत २२ मे रोजी घडलेल्या तब्बल ३५ लाख ४२ हजारांच्या घरफोडी प्रकरणाचा छडा नेरूळ पोलिसांनी लावून दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून १५५ ग्रॅम सोन्याचे दागिने व नऊ लाखांची रोख रक्कम असा एकूण १६ लाखांचा ऐवज जप्त केला आला.
नेरूळ सेक्टर-३ मधील गंगोत्री सोसायटीत राहणारे उदय कृष्णा तामसे (वय ६६) हे गत २२ मे रोजी सायंकाळी कामानिमित वाशी येथे गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद असलेले घर फोडून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने असा तब्बल ३५ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत नेरूळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक तुषार बच्छाव आणि आकाश ठाकरे यांचे तपास पथक तयार केले. या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपींचा शोध घेतला असता, या घरफोडीतील संशयित आरोपी अस्लम इसराईल शेख उर्फ कुरेशी (वय ५०) हा मुंबईतील ट्रॉम्बे भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने ३२ तासांत सापळा रचून अस्लमला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने दिनेशकुमार नंदलाल सोनी (वय ३७) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली, मात्र दिनेशकुमार हा गुन्ह्यानंतर दुरांतो एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशकडे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी भुसावळ रेल्वेस्थानक येथून आरोपी दिनेशकुमार याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून १५५ ग्रॅम सोन्याचे दागिने व नऊ लाखांची रोख रक्कम, असा एकूण १६ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. आरोपी अस्लम इसराईल शेख उर्फ कुरेशी याच्या अटकेमुळे मुंबई, मिरा- भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबईच्या हद्दीत दाखल असलेले सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.