

दिघा रेल्वेस्थानकासमोर वाहतूक कोंडी
नागरिकांकडून पादचारी पूल उभारण्याची मागणी
वाशी, ता. १ (बातमीदार) ः ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे व ऐरोलीच्या मध्ये एमआरव्हीसीच्या माध्यमातून दिघागाव रेल्वेस्थानक उभारण्यात आले आहे. हे रेल्वेस्थानक सुरू होऊन जवळपास दीड वर्ष होण्यास आले आहे; मात्र सद्यस्थितीत दिघागाव रेल्वेस्थानकासमोर ठाणे-बेलापूर मार्गावरून प्रवाशांना ये-जा करावी लागते. शिवाय, वाढत्या गर्दीमुळे मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावर पादचारी पूल उभारण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
नवी मुंबई व ठाणे महापालिका यांच्या वेशीवर असणाऱ्या ठाणे-बेलापूर मार्गावर दिघागाव रेल्वेस्थानक उभारण्यात आले आहे. दिघा रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. शिवाय, स्थानकाच्या बाजूला ऐरोली नॉलेज पार्क आहे. यामध्ये हजारो आयटी कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. तर पूर्वेस आनंदनगर, गणपती पाडा, ईश्वरनगर, रामनगर आदी झोपडपट्टीसह नागरी वसाहती आहेत. येथील नागरिक मोठ्या प्रमाणात दिघा रेल्वेस्थानकाचा वापर करतात. मागील काही दिवसांपासून या रेल्वेस्थानकात वाढलेल्या गर्दीमुळे सकाळ-संध्याकाळ लोंढेच्या लोेंढे रेल्वेस्थानकातून बाहेर पडत आहेत. यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. या वाहतूक कोंडीचा नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे- बेलापूर मार्गावरील वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर रोजच कळव्यापासून दिघा परिसरापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे ठाणे- बेलापूर मार्ग ओलांडून दिघागाव रेल्वेस्थानकामध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अपघाताला आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
......................
दिघागाव रेल्वेस्थानकासमोर पादचारी पूल बांधण्यात यावा, यासाठी महापालिकेकडे मागणी केली आहे. या पुलासाठी आमदार गणेश नाईक यांच्याकडून एक कोटीचा आमदार निधीदेखील देण्यात आलेला आहे. पादचारी पुलाअभावी या ठिकाणी पादचाऱ्यांना अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तर येथील वाहतूक कोंडीदेखील नित्याचीच झाली आहे.
- नवीन गवते, माजी स्थायी समिती सभापती, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.