कपिल पाटील फाऊंडेशनची मदत

कपिल पाटील फाऊंडेशनची मदत
Published on

कपिल पाटील फाउंडेशनची मदत
शहापूर (वार्ताहर): तालुक्यातील कसारा घाटमाथ्यावर वसलेल्या अतिदुर्गम माळ गावात अवकाळी पाऊस व वादळामुळे गावकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले होते. अनेकांच्या घरांची छपरे उडून गेली आहेत. कौलारू घरेदेखील बोडकी झाली आहेत. या गावकऱ्यांना कपिल फाउंडेशनच्या माध्यमातून मदत देण्यात आली. तसेच राज्य सरकारचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गावकऱ्यांना सांगितले. माळ, विहिगाव या आदिवासीबहुल गावांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com