वसईत तब्बल ५४ किलोचा फणस
नालासोपारा, ता. २ (बातमीदार) : वसईमधील विविध जातींची केळी, सुकेळी, सोनचाफा, जाई-जुई, झेंडू प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता भल्या मोठ्या फणसाने वसई पुन्हा चर्चेत आली आहे. नाळे परिसरातील वाळुंज गावातील एका शेतकऱ्याच्या वाडीत फणसाच्या झाडाला माणसाने न उचलणारे तीन फणस लागले होते. त्यातील एकाचे वजन केले असता तब्बल ५४ किलो ५०० ग्रॅम भरले होते. वसईच्या इतिहासात प्रथमच एवढे भलेमोठे फणस लागल्याने शेतकऱ्यासह वयोवृद्ध नागरिकही अचंबित झाले आहेत.
वाळुंज येथील आनंद पाटील यांची सहा एकरची वाडी आहे. यामध्ये वेगवेगळ्या जातींची केळी, खारीक, आंब्यासह शेताच्या बांधावर सहा फणसाची झाडे लावली आहेत. आठ वर्षांपूर्वी लावलेल्या एका फणसाच्या झाडाला यंदाच्या वर्षी तीन फणस लागले होते. यातील दोन फणस हे ३० ते ४० किलो, तर एक फणस अतिशय वजनदार, आकाराने मोठा होता. हा फणस झाडावरून काढून त्याचे वजन केले असता ५४ किलो ५०० ग्रॅम भरले. पाटील कुटुंबीयांनी हा फणस कापून आपल्या नातेवाइकांसह शेजाऱ्यांना त्यातील गरे वाटले.
कोकणात फणसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते, पण वसई-विरार परिसरात फणसाची जास्त लागवड नाही. आनंद पाटील यांच्या शेतातील भल्या मोठ्या वजनाच्या फणसाने येथील शेतकऱ्यांच्या आशाही आता पल्लवित झाल्या आहेत.
मी एका खासगी कंपनीत काम करून शेती करतो. शहरीकरणामुळे आता शेती संपुष्टात येत चालली आहे, पण काही शेतकऱ्यांनी आपली शेती जपली आहे. तरुणांनी जोपासना केली तर वसईची हरित संस्कृती वाचेल.
- आनंद पाटील, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.