वासिंदमधील तब्बल ६०१ नागरिकांना श्वानदंश

वासिंदमधील तब्बल ६०१ नागरिकांना श्वानदंश

Published on

वासिंदमधील तब्बल ६०१ नागरिकांना श्वानदंश
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; मनसेकडून आंदोलनाचा इशारा
शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : तालुक्यातील वासिंद शहरात तब्बल ६०१ जणांना श्वानदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत ६०१ जणांना भटक्या श्वानांनी चावा घेऊन जखमी केले आहे.
वासिंद येथील मनसेचे शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव वाढल्याने व आतापर्यंत तब्बल ६०१ जणांना या श्वानांनी चावा घेतल्याने भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्याची मागणी शहापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्याकडे केली होती. गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन सोमवारी (ता. २) विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी उपाययोजना आखण्याचे निर्देश स्थानिक प्राधिकरण म्हणून ग्रामपंचायतीला दिले आहेत.

श्वानदंशाच्या रुग्णांची आकडेवारी
अमोल बोराडे यांनी वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्राकडे श्वानदंशाच्या रुग्णांच्या संख्येची आकडेवारी मागितली होती. या माहितीत डिसेंबर २०२४ या महिन्यात ६८ श्वानदंशाचे रुग्ण आढळले आहेत, तर २०२५ या वर्षातील जानेवारी महिन्यात ९९, फेब्रुवारी महिन्यात १०४, मार्च महिन्यात १०६, एप्रिल महिन्यात १२८ तर मे महिन्यात ९६ जणांना श्वानदंश झाल्याची बाब समोर आली आहे.

मनसेकडून आंदोलनाचा इशारा
अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ६०१ जणांना श्वानदंश होऊनही ग्रामपंचायतीने उपाययोजना न आखल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे, तर येत्या १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com