जांभळाची आवक वाढल्याने दर घसरले

जांभळाची आवक वाढल्याने दर घसरले

Published on

तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : लांबट आणि गोल आकार, चवीला आंबट-गोड व आरोग्यदायी रसरशीत जांभळे सध्या बाजारात दाखल झाली आहेत. काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आले, की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. गतवर्षी जांभळाचे भाव गगनाला भिडले होते. यंदा मात्र आवक वाढल्याने भाव नियंत्रणात आहेत. हंगाम चांगला असल्याने चांगल्या दर्जाची जांभळे प्रतिकिलो २०० ते ३०० रुपयांनी विकली जात असल्‍याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजारातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
ग्राहकांना चांगली प्रतीची जांभळे उपलब्ध होत आहेत. राज्यासह परराज्यातून आवक वाढल्याने भाव सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहेत. याशिवाय सध्या पाऊस सुरू असल्याने माल लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने व्यापारीही कमी भावाने विक्री करीत आहेत. घाऊक बाजारात जरी जांभळाचा भाव उतरला असला तरी किरकोळ बाजारात मात्र भाव चढेच आहेत.
राज्यातील विविध भागांतून जांभळाची आवक वाढली आहे. सध्या गुजरात, कर्नाटक, गोवा राज्‍यातून येणाऱ्या जांभळांचा हंगाम संपला असून महाराष्ट्रातील इंदापूर, श्रीगोंदा, नगर भागातून जांभळाची आवक वाढली आहे. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जांभळाचा वापर तसेच आरोग्यदायी गुणधर्म आणि मधुमेहासारख्या आजारांवर उपयुक्त असल्‍यानेही ग्राहकांची पसंती मिळत आहे.
गेल्या वर्षी ६०० ते ८०० रुपये किलो भावाने विकल्‍या जाणाऱ्या जांभळाचे दर यंदा ३०० ते ४००वर आले आहेत. हलक्या प्रतीची जांभळे ही घाऊक बाजारात ३० ते ४० रुपये किलोने विकली जात आहेत. तर चांगल्या दर्जाची जांभळे प्रतिकिलो २०० ते ३०० रुपयांनी विकली जात आहेत. बाजारात दररोज २० ते २५ टन जांभळाची आवक वाढली आहे.

सध्या जांभळांची आवक वाढली आहे. त्यामुले भाव घसरले आहेत. पावसामुळे जांभूळ लवकर खराब होत आहे. सध्या परराज्यातील जांभळाचा हंगाम संपला असून महाराष्ट्रतील जांभळांची आवक सुरू असून जुलैपर्यंत हंगाम सुरू राहील.
- किरण जगताप, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com