गटाराची सफाई करताना, स्थानिक नागरिक जखमी..

गटाराची सफाई करताना, स्थानिक नागरिक जखमी..

Published on

गटाराची सफाई करताना स्थानिक नागरिक जखमी
गटार तुंबल्याने, घाण पाणी घरात; स्थानिक हतबल
अनिल चासकर, सकाळ वृत्तसेवा
कांदिवली, ता. ५ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेला साईनगर तुळस्करवाडी येथील भाये चाळीत पावसाचे पाणी तुंबल्याने स्थानिकांच्या घरात पाणी शिरले. चाळीतील गटारातून पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक स्वतः सफाई करण्यास उतरले. या वेळी गटारातील लादी हाताला लागल्याने शरद बडदे जखमी झाले आहेत.
साईनगर विभागात तुळस्करवाडीमध्ये दाटीवाटीची लोकवस्ती आहे. दोन चाळींमधील गटारासह जेमतेम चार फुटांचा मार्ग आहे. बुधवारी (ता. ४) गटारातील पाण्याचा निचरा होत नसल्याने मुसळधार पावसात पाणी साचून ते आजूबाजूच्या घरांमध्ये घुसले. या वेळी चाळीतील नागरिकांनी स्वतः चिखलगाळ काढून गटाराची साफसफाई करण्यास सुरुवात केली. पोकळ झालेल्या गटाराची लादी शरद बडदे यांच्या हाताला लागल्याने १२ टाके पडले आहेत. पालिकेकडून गटाराची कामे न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, तातडीने ही कामे करून आम्हा गोरगरिबांना दिलासा द्यावा, अशी विनंती स्थानिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

उपविभाग प्रमुख व पालिका अभियंत्यांनी केली पाहणी
येथील परिस्थिती स्थानिक महिला संघटक रेखा कदम यांनी उप विभागप्रमुख आशीष पाटील यांना सांगितली. पालिका अभियंता राहुल निकम आणि पाटील यांनी गटाराची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावले. पाऊस जास्त पडला की पाणी घरात शिरते. यावर निकम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com