ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा

ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा

Published on

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे प्रलोभन दाखवून सायबर टोळीने नेरूळमध्ये राहणाऱ्या सीएकडून तब्बल दोन कोटी तीन लाख उकळल्‍याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणात सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक झालेला सीए नेरूळमध्ये राहात असून, एप्रिलमध्ये सायबर टोळीतील सदस्यांनी सीएला व्हॉट्सॲपवर संपर्क साधून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात विचारणा केली. त्यानंतर त्‍यांचा एजेंल फोरम नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समावेश केला. ट्रेडिंग, गुंतवणुकीसंदर्भात माहिती देत चांगल्या परताव्याचे प्रलोभन दाखवल्‍याने सीएने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. त्‍यानंतर गनस्टन्स.कॉम या वेबसाईटवर त्यांचे अकाउंट सुरू केल्याचे भासवले आणि गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार सीएने बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात केली. सीएने भरलेले पैसे तसेच शेअर्स खरेदी केल्यानंतर झालेला फायदा गनस्टन्स या वेबपेजवर दाखवला. त्यानुसार सीएने सायबर चोरट्यांच्या सूचनेनुसार महिनाभरात वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल दोन कोटी तीन लाख रुपये पाठवले. यात सीएला तीन कोटींपेक्षा अधिक फायदा झाल्याचे दाखवण्यात आले, मात्र जेव्हा सीएने काही रक्कम काढण्याचा प्रयत्‍न केला, तेव्हा कर स्वरूपात काही रक्कम भरावी लागेल, असे सायबर टोळीकडून सांगण्यात आले. यात आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सीएने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com