भिवंडीत आठ लाखांची वीज चोरी

भिवंडीत आठ लाखांची वीज चोरी

Published on

भिवंडीत आठ लाखांची वीज चोरी
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : काही दिवसांपासून भिवंडीतील टोरेंट पॉवर कंपनीने वीजचोरांबाबत सक्तीची कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत टोरेंट पॉवर कंपनीने शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत छापे टाकून सुमारे आठ लाखांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. यासोबतच वीज चोरीमध्ये सहभागी असलेल्या सात जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोरेंटचे व्यवस्थापक हितेश सुथार यांनी ५ जून रोजी भिवंडीतील बाला कम्पाउंड परिसरातील घर क्रमांक ६२७ च्या दुसऱ्या मजल्यावर छापा टाकला. तेथे त्यांना १३ एप्रिल २०२४ ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान अन्सारी मोहम्मद समीप, मुसिफ, मोहम्मद शमीम अन्सारी यांनी थेट कनेक्शनद्वारे सात लाख २४ हजार ७२२ रुपयांची १९ हजार २१२ युनिट वीज चोरी केल्याचे आढळून आले. वीज चोरीच्या तिन्ही आरोपींविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे टोरेंट पॉवर कंपनीचे कार्यकारी अधिकारी शिवलाल आंबेगावकर यांना तपासणीदरम्यान चार आरोपींनी नारपोलीतील न्यू गौरीपाडा येथील गोल्डन हॉटेलजवळील घर क्रमांक ७७६ मध्ये बेकायदा वीज वापरल्याचे आढळून आले.

बिजमदार इस्तिहार अहमद अन्सारी, पप्पू नबिउल्लाह, जावेद खान आणि शमीम नबिउल्लाह अन्सारी यांनी त्यांच्या घराजवळील मिनी सेक्शन पिलरला वीजजोडणी बायपास करून बेकायदा १लाख १७ हजार २३८.८२ रुपयांची १,६२३ युनिट वीज वापरली होती. या चोरीमुळे टोरेंट पॉवर कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक घोलप या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com