शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग

Published on

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग
प्‍लॅस्टिकऐवजी स्‍टीलच्या डब्याला पसंती; दर वाढल्याने खिशाला कात्री
तुर्भे, ता. ८ (बातमीदार) ः शाळेची पहिली घंटा वाजण्यापूर्वी साहित्य खरेदीकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यात शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. विशेष म्‍हणजे आता प्‍लॅस्‍टिकऐवजी स्‍टीलच्या डब्याला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील शाळा सोमवारी ९ जून रोजी उघडणार असल्याने नवी मुंबईतील बाजारपेठा आणि शैक्षणिक साहित्याच्या दुकानांमध्ये पालकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात उन्हाळी सुट्टीचा शेवटचा वीकेंड असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली होती. या वेळी ही शैक्षणिक साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल, कंपास बॉक्स, आकर्षक पेन, पाण्याच्या बाटल्या, स्कूल बॅग आदींनी दुकाने सजली आहेत. असे असले तरी शैक्षणिक साहित्याचे दर वाढले असल्याने पालकांच्या खिशाला यंदा कात्री लागली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश, नवे बूट, दफ्तर, वह्या-पुस्तके, कंपासपेटी, पाऊच या शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची विविध मार्केटसह डीमार्ट व स्टेशनरीच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. यंदाही बाजारपेठेत विविध प्रकारच्या लहानग्यांना आकर्षित करणाऱ्या वह्या उपलब्ध आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडू, निसर्ग आदी चित्रे वह्यांवर दिसत आहेत. विविध रंगांच्या कार्टूनची चित्रे असणाऱ्या विविध आकाराच्या स्कूल बॅग बाजारात आल्या आहेत. शिवाय बार्बी डॉल, स्पायडर मॅन यांची चित्रे असलेली बॅग तसेच टिफीन बॉक्सही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत; मात्र याच्या किमती जास्त असल्याने अनेक दुकानांत पालक मुलांच्या हट्टाला आवर घालताना दिसून आले. खोडरबर, पेन्सिल, पेन, रंगपेटी असा एकत्रित संचदेखील बाजारात उपलब्ध असल्याने तो घेण्याकडे कल वाढला असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. याशिवाय सर्वत्र स्टीलच्या बॉटल, स्टीलचे फॅन्सी टिफिन बकंपॉक्सना मागणी वाढली आहे.
.........................
वह्यांचे दर (एक डझनचा दर)
फुलस्केप वही - ५०० ते ७००
लहान वही - २५० ते ५००
................
इतर साहित्याचे दर (एक नग)
चित्रकला वही - २० ते ९०
रंग - १० ते १५०
कंपास- १०० ते ५००
टिफीन - ९९ ते ८००
पाणी बॉटल - ५० ते ७००
पेन्सिल बॉक्स - ४० ते १२०
पेन बॉक्स - १० ते ३००
...................
स्कूल बॅग वयोगटानुसार दर
५ ते १५ वर्षे - ३०० ते ११००
१५ ते १८ वर्षे - ५०० ते १५००
१८ वर्षांपुढे - ५०० ते १२००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com