कौटुंबिक हिंसाचारात वाढ
पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असताना ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २०२५ या वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांनी २००चा आकडा पार केला आहे. सरासरी पाहिल्यास एक गुन्हा दररोज दाखल होत आहे. यामध्ये कल्याण परिमंडळामधील सर्वाधिक ८७ गुन्ह्यांचा समावेश असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. दाखल झालेल्या सर्व गुन्हे १०० टक्के उघडकीस आणून २५६ जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्याचा दावा ठाणे शहर पोलिसांनी केला आहे.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षी म्हणजे २०२४मध्ये तब्बल ४६३ गुन्हे नोंदवले होते. ते सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात आल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यातच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरण समोर आले. त्यानुसार ठाण्यात महिलांसबंधित गुन्ह्यांची माहिती घेताच धक्कादायक माहिती समोर आली. १ १ जानेवारी ते ३१ मे अशा पाच महिन्यांत तब्बल २०६ गुन्हे नोंदवले आहेत. त्यामध्ये एकूण २५६ जणांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आयुक्तालयातील ५ परिमंडळाचा विचार केल्यास ठाणे शहरात दोन परिमंडळ आहेत. दोन परिमंडळांपेक्षा इतर परिमंडळ इतके गुन्हे नोंदवले आहेत. दुसरीकडे सांस्कृतिक राजधानी अशी ओळख झालेल्या कल्याण-डोंबिवलीत शंभरच्या आसपास नोंदवले आहेत. या परिमंडळात सर्वाधिक म्हणजे १४७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्या व्यतिरिक्त भिवंडी आणि उल्हासनगर या दोन्ही परिमंडळांनी प्रत्येकी ५०चा आकडा जवळपास गाठलेला आहे. अशाप्रकारे एकूण २५६ गुन्हे हे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
महिलांवरील गुन्ह्यांची नोंद प्रत्येक पोलिस ठाण्यात करण्यात येत आहे. हे गुन्हे नोंदवताना कोणतीही हयगय केली जात नाही. गुन्हा दाखल झाल्यावर त्याचा तपासही १०० टक्के पूर्ण केला जातो. तसेच, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाते.
- अमरसिंह जाधव, उपायुक्त, गुन्हे शाखा, ठाणे पोलिस
हुंडाबळीचे चार गुन्हे
यावर्षी पहिल्या चार महिन्यांत (जानेवारी-एप्रिल) हुंडाबळीचे चार गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये एक डायघर, एक वर्तकनगर, एक कापूरबावडी व एक उल्हासनगर पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील वर्षाची आकडेवारी पाहिली तर सहा गुन्हे दाखल झाले होते. त्या तुलनेत यंदाचा हा आकडा जास्त असल्याचे दिसत आहे.
वागळे परिमंडळात आरोपींचा पिंजरा रिकामाच
ठाणे पोलिस आयुक्तालयात पाच परिमंडळ आहेत. त्यामधील कल्याणात सर्वाधिक १४७ जण आरोपींच्या पिंजऱ्यात आहेत. त्यापाठोपाठ भिवंडी ६६ आणि ठाणे शहर ४२ आहेत. उल्हासनगरात एकावर गुन्हा दाखल आहे. मात्र, वागळे इस्टेट या एकमेव परिमंडळात २१ गुन्हे नोंदवले असले, तरी आरोपींचा पिंजरा मात्र रिकामा असल्याचे आकडेवारी दिसत आहे.
जानेवारी ते मे २०२५
परिमंडळ गुन्हे दाखल / उघड / आरोपी
ठाणे शहर २५ / २५/ ४२
वागळे इस्टेट २१ / २१/ ००
भिवंडी ४८ / ४८/ ६६
कल्याण ८७ /८७/ १४७
उल्हासनगर ४९/ ४९ /०१
एकूण २०६/२०६/२५६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.