''इबिस हॉटेल्स''ची शहरव्यापी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम
‘इबिस हॉटेल्स’ची शहरव्यापी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम
मुंबई, ता. ९ : ‘जागतिक महासागर दिन २०२५’निमित्त मुंबईतील ‘इबिस हॉटेल्स’ने प्रोजेक्ट मुंबईच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविली. या वेळी हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक समुदायातील २५०हून अधिक स्वयंसेवकांनी समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता केली. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील जुहू कोळीवाडा समुद्रकिनाऱ्यावरही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथून स्वयंसेवकांनी सुमारे ५०० किलोग्राम प्लॅस्टिक आणि विघटन न होणारा कचरा गोळा केला. सागर परिसंस्था आणि किनारी आरोग्य जपण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेमागील उद्देश होता.
अमृता बॅनर्जी (जनरल मॅनेजर, इबिस मुंबई विमानतळ), संदीप सटांगे (जनरल मॅनेजर, इबिस मुंबई बीकेसी) आणि रूपम दत्ता (क्लस्टर जनरल मॅनेजर, इबिस मुंबई - नवी मुंबई, विक्रोळी आणि ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दरवर्षी जागतिक स्तरावर एक कोटी मेट्रिक टनांहून अधिक प्लॅस्टिक कचरा समुद्रात जातो. यामुळे सागरी जीवसृष्टी आणि किनारी पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी इबिसतर्फे प्रयत्न केले जात आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच इबिस टीमने जागरूकता कार्यक्रमही आयोजित केले होते. तसेच पर्यावरणपूरक शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि जबाबदार किनारी वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक शालेय विद्यार्थी, पर्यटक आणि मच्छीमारांशी संवाद साधला, असे इबिस स्टाइल्स इंडियाचे संचालक (ऑपरेशन्स) तेजस जोस म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.