

‘न्यू होम मिनिस्टर’ विशेष कार्यक्रमात महिलांचा प्रतिसाद
पनवेल, ता. ११ (वार्ताहर) ः कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘न्यू होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम खारघर येथे पार पडला आहे.
घर आणि समाज या दोन्ही आघाड्यांवर आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या मातृशक्तीच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहिणींना त्यांची नेतृत्वक्षमता, संवादकौशल्य आणि विनोदबुद्धी दाखवण्याची संधी मिळाली. या वेळी विशेष उपस्थितीत म्हणून सुप्रसिद्ध सिने-अभिनेत्री शिवानी सुर्वे (‘देवयानी’, ‘फुलवा’ मालिका आणि ‘ट्रिपल सीट’ चित्रपट फेम), सुप्रसिद्ध सिने-अभिनेत्री मेघा धाडे (बिग बॉस मराठी विजेती), सुप्रसिद्ध सिने-अभिनेता क्रांती नाना माळेगावकर तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नेत्रा पाटील, ब्रिजेश पटेल, साधना पवार, संयोजक नगरसेवक समीर कदम, उदय पाटील, विक्रांत पाटील प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी महिलावर्गाच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि सकारात्मक प्रतिसादाने कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.