पाणीपुरवठा विभागाच्या टाकी रामभरोसे

पाणीपुरवठा विभागाच्या टाकी रामभरोसे
Published on

उल्हासनगर, ता. ११ (बातमीदार) : सुरक्षा रक्षक चक्क झोपा काढत असल्याने उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प परिसरामधील सर्टिफाइड शाळेजवळील पाण्याच्या टाकीची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचा आणि परिसर दारू पिण्याचा अड्डा बनल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी समोर आणला आहे. या टाकीजवळ गर्दुल्ल्यांचा वावर होत असल्याने परिसर वादग्रस्त बनला होता.
महापालिकेने कुर्ला कॅम्प परिसरामधील सर्टिफाइड शाळेजवळील पाण्याच्या टाकीजवळ खोली बांधली आहे. तिथे ठेकेदाराकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आला आहे. मात्र, हा सुरक्षा रक्षक ठेकेदाराकडून पुरवण्यात आलेला गणवेश घालत नसून चक्क झोपा काढत असल्याची माहिती मिळाल्यावर ॲड. चंदनशिव यांनी त्याचे फोटो व्हायरल केले आहेत. दुसरीकडे हा परिसर दारू पिण्याचा अड्डा बनल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सुरक्षा रक्षक हा हाफ पॅट तसेच बनियानवर फिरत असताना चंदनशिव यांनी त्याला टाकीखाली लहान मुले दारू पित असल्याचे दिसूनही त्यांना काही का बोलत नाही, अशी विचारणा केली. त्यावर त्याने आम्हाला असे काही आदेश नाही. फक्त टाकीवर लक्ष देतो. टाकीवर कुणाला जाऊ द्यायचे नाही एवढेच आमचे काम आहे. तुम्हाला वाटल्यास वरिष्ठ अधिकारी मिश्रा यांना विचारू शकता, असे उत्तर दिले, असे ॲड. चंदनशिव यांनी सांगितले. दरम्यान, सुरक्षा एजन्सीवर कारवाई करून त्यांचे टेंडर काढण्यात यावे, अशी मागणी त्यां‍नी केली आहे. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com