बदलापूर स्थानकात चेंगराचेंगरीची भीती

बदलापूर स्थानकात चेंगराचेंगरीची भीती

Published on

बदलापूर स्थानकात चेंगराचेंगरीची भीती
बदलापूर, ता. १० (बातमीदार) : मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघाताला कारणीभूत कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच बदलापूर रेल्वेस्थानकातून सकाळी आणि संध्याकाळी लोकलला तुडुंब गर्दी असते. त्यामुळे लोकल दरवाजातून लटकून होणारा प्रवास अशा अपघातांचे आमंत्रण घेऊन येऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

फलाट क्रमांक एक बंद केल्याने बदलापूर रेल्वेस्थानकात सकाळी लोकल ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना होण्याची भीती सर्वसामान्य बदलापूरकर व्यक्त करीत आहेत. बदलापूर, कर्जत या स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये अर्धा ते पाऊण तासाचे अंतर आहे. त्यामुळे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते.

दोन नंबर प्लॅटफॉर्म एका बाजूने लोखंडी कुंपण लावून बंद केला आहे. त्यामुळे होम प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना होण्याची भीती आहे. मुंब्रा दुर्घटनेनंतर बंद दरवाजांच्या लोकल चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे गुदमरून मरायचं का? आता जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासन लक्ष देईल का, असा सवाल बदलापूरकर रेल्वे प्रवासी करीत आहेत.

आम्ही काय जीव देण्यासाठी लोकलने प्रवास करतो का, जगण्याच्या संघर्षात फक्त रेल्वे प्रशासनाच्या आणि राजकारण्यांच्या निष्क्रियतेमुळे बळी जात आहोत. लोकल फेऱ्या वाढत नाहीत, त्यामुळे लोकलच्या दरवाजात लटकून जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यात लोकलचे दरवाजे बंद केले तर आम्ही गुदमरून मरायचे का?
- आदित्य जाधव, प्रवासी

फलाट क्रमांक एकची एक बाजू लोखंडी कुंपण टाकून बंद केली. त्यात होम प्लॅटफॉर्मदेखील आखुडता बांधला आहे. या अरुंद प्लॅटफॉर्मवरून दोन प्लॅटफॉर्मच्या गर्दीने नक्की प्रवास कसा करायचा, लवकरात लवकर हे कुंपण हटवा आणि बदलापूरसाठी सकाळच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा, अन्यथा बदलापूरकरांनादेखील किड्या-मुंग्यांसारखे मरावे लागेल.
- कमल दुबे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com